Thursday, 15 February 2018

पीएनबी बँकेच्या मुंबई शाखेत 11,360 कोटींचा घोटाळा

पीएनबी बँकेच्या मुंबई शाखेत 11,360 कोटींचा घोटाळा 

देशाच्या सार्वजनिक क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत तब्बल 11 हजार 360 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मुंबईतील एका शाखेतून ठराविक खातेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी हा बेकायदा व्यवहार होत होता. घोटाळ्याची ही रक्कम बॅंकेच्या एकूण बाजार मुल्याच्या (मार्केट कॅपिटलायझेशन) जवळपास एक तृतियांश आहे. या घोटाळ्यामुळे शेअर बाजारात बँकेच्या शेअर्सना 10 टक्क्यांचं नुकसान झालं आहे तर सामान्य खातेधारकांनाही त्याच्या बॅंकेत जमा असलेल्या प्रत्येक 100 रूपयांमागे 30 रूपयांचं नुकसान सहन करावं लागू शकतं, अशी भीती व्यक्त होत आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजनुसार पंजाब नॅशनल बॅंकेचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 36 हजार 566 कोटी रूपये आहे आणि त्यांनी जवळपास 4.5 लाख कोटी रूपये मार्केटमध्ये कर्ज दिलं आहे. बॅंकेतील घोटाळ्याच्या वृत्तानंतर गुंतवणुकदारांना एक दिवसात जवळपास 3 हजार कोटी रूपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे.

No comments:

Post a Comment