Tuesday, 20 February 2018

नोटाबंदीच्या काळात नीरव मोदीकडून हिरे खरेदी करणाऱ्यांची चौकशी

नोटाबंदीच्या काळात नीरव मोदीकडून हिरे खरेदी करणाऱ्यांची चौकशी


पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींचा गडा घालून परदेशी पळालेल्‍या नीरव मोदीकडून नोटाबंदीच्या काळात रोखीने हिरे खरेदी करणाऱ्या देशातील उद्योजक, बॉलिवूडमधील कलाकार आणि सेलिब्रिटींची आयकर विभाग चौकशी करणार आहे. ८ नोव्हंबर २०१६ रोजी पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलणातून बाद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. या कालावधीत काही उद्योजकांसह कलाकारांनी नीरम मोदीकडून रोख रक्‍कम देवून हिरे खरेदी केले होते.  नीरव मोदीच्या कार्यालयांवर इडीने छापे टाकल्‍यानंतर ही बाब समोर आली आहे. सुमारे ११ हजार ५०० कोटी रुपयांचा पंजाब नॅशनल बँकेला गंडा घातल्याच्या प्रकरणात हिरे व्यापारी नीरव मोदी हा मुख्य सूत्रधार आहे. सीबीआय आणि ईडीने या प्रकरणी त्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली आहे. 

No comments:

Post a Comment