2007 गोरखपूर दंगल प्रकरणी योगी आदित्यनाथांना उच्च न्यायालयाचा दिलासा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.2007 मध्ये उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे झालेल्या दंगलीदरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणाची याचिका गुरूवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणात गोरखपूरचे तत्कालीन खासदार आणि वर्तमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्य आरोपींपैकी एक होते. प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांच्या तपासात कोणतेही त्रुटी समोर आलेली नाही. त्यामुळे ही मागणी फेटाळून लावत असल्याचे हायकोर्टाने सांगितले.
__________________________

No comments:
Post a Comment