
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी यांच्या गाडीला बुधवारी सकाळी राजस्थानच्या कोटा-चितौड महामार्गावर अपघात झाला. या अपघातात जशोदाबेन किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. कोट्टा-चित्तोड महामार्गावर हा अपघात घडला. जशोदाबेन यांना चित्तोडच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. जशोदाबेन यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच उपचारांनंतर त्या स्वत:च चालत गाडीत जाऊन बसल्या. जशोदाबेन कोट्टा येथे एका विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी गेल्या होत्या. तिथून परतत असताना हा अपघात घडला.
No comments:
Post a Comment