हवाई दलातील कॅप्टन पाकच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला

पाकची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून हवाई दलातील गोपनीय माहिती देणाऱ्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून या अधिकाऱ्याचे नाव अरुण मारवाह (५१) असे असून तो ग्रुप कॅप्टनपदावर कार्यरत होता. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून हवाई दलात ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत असलेला अरुण हा दोन तरुणींच्या संपर्कात आला. मॉडेल असल्याचे त्या तरुणींनी भासवत अरुणशी संपर्क वाढवला. त्या तरुणींनी काही दिवसांनी अरुणशी अश्लील भाषेत संवाद साधायला सुरुवात केली. त्यांच्या जाळ्यात अरुण अडकताच त्यांनी अरुणकडून गोपनीय माहिती मागवली. हवाई दलातील गोपनीय कागदपत्रांचे फोटो काढून ते व्हॉट्स अॅपद्वारे अरुणने आयएसआयला पुरवल्याचा आरोप आहे. त्याने आयएसआयला हवाई दलातील प्रशिक्षण आणि युद्धाशी संबंधित कसरती याबद्दलची माहिती पुरवली होती.
No comments:
Post a Comment