तुरुंगात टाकून जर पैसे मिळणार असतील जरूर टाका – डीएस कुलकर्णी

आर्थिक गर्तेत सापडलेले विख्यात बिल्डर डी. एस. कुलकर्णीं यांनी जर गुंतवणूकदारांचे पैसे मला तुरुंगात टाकून मिळणार असतील तर मला जरूर तुरूंगात टाका, असे भावनिक आवाहन केले आहे. आमच्या प्रॉपर्टी मूठभर लोकांनी उठवलेल्या अफवांमुळे कोणी विकत घेत नसल्याची खंत डीएसकेंनी बोलून दाखवली. मुंबई उच्च न्यायालयात आज डीएसके यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. न्यायालयाने गेल्या सुनावणीपर्यंत सांगितलेली रक्कम भरण्यात डीएसके अपयशी ठरल्यामुळे आज किमान तरी रक्कम डीएसके भरणार की नाही याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.
No comments:
Post a Comment