फ्लोरिडातील शाळेत अंदाधुंद गोळीबारात १७ ठार
अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील पार्कलंड मधल्या मार्जरी स्टोनमन हायस्कूल मध्ये बुधवारी शाळेत घुसून १९ वर्षीय हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १७ जणांचा जीव गेला असून किमान २० जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून शाळेतून काढून टाकल्याचा बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे समजते. गोळीबार सुरु होताच विद्यार्थ्यांमध्ये एकाच दहशत पसरली, अनेकांनी मदतीसाठी हाका मारायला सुरवात केली तर अनेकांनी फोनवरून बाहेर संपर्क साधायचा प्रयत्न केला. या गावाच्या शेरीफनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताला ताब्यात घेतले गेले असून जखमींना रुगणालयात हलविले गेले आहे. या हल्ल्यानंतर देशात पुन्हा शस्त्र कायद्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.
No comments:
Post a Comment