सरसंघचालकांवर लष्करावर केलेल्या अवमानजनक वक्तव्यामुळे गुन्हा दाखल
बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये लष्करावर केलेल्या वक्तव्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून न्यायालयात हे प्रकरण गेले आहे. त्यावर १५ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हे प्रकरण मुजफ्फरपूर शहरातील रहिवासी एम राजू नयीआर यांनी दाखल केले आहे. आपल्या तक्रारीत नयीआर यांनी म्हटले आहे, की सरसंघचालकांनी आपल्या वक्तव्यामुळे केवळ लोकांच्याच भावना दुखावल्या नाहीत तर भारतीय सैन्याचाही अपमान केला आहे. सैन्याला तयारीसाठी ६-७ महिने लागतील मात्र, देशासाठी लढायला ३ दिवसांतच सैन्याची निर्मिती करण्याची क्षमता संघामध्ये आहे, असे वादग्रस्त वक्तव्य सरसंघचालकांनी रविवारी मुजफ्फरपूरमधील शिबिरात केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक लष्करी संघटना नाही, मात्र आपली शिस्त लष्कराप्रमाणेच आहे. देशाला गरज पडल्यास तसेच संविधानाने आणि कायद्याने आम्हाला परवानगी दिली तर आम्ही तात्काळ शत्रूशी लढण्यास तयार आहोत, असे भागवत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरातून विरोध झाला.
No comments:
Post a Comment