५० लाख कर्मचाऱ्यांना मिळू शकते सातवे वेतन आयोग
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार आंनदाची बातमी आहे. कारण मोदी सरकार लवकरच त्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करणार आहे. याचा फायदा 50 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. एप्रिल 2018 मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली याची घोषणा करण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगासाठी केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकार सातवा वेतन आयोग वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार कर्मचाऱ्यांची वाढणारी पगार येणाऱ्या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसापूर्वी पगारवाढ करण्याचे आश्वासन दिलं होतं. जर मोदी सरकार कर्मचाऱ्यांचा पगार वाढवणार असतील तर कमीत कमी त्यांचा पगार 24000 रुपये होणार आहे. याची अधिकृत घोषणा झालेली नाही. केंद्रीय कर्मचारी मॅट्रिक्स लेवल 1-2मध्ये येतात. त्यांचीच पगारवाढ होणार आहे.
No comments:
Post a Comment