इशरत जहाँ चकमक: गुजरातचे माजी पोलीस महासंचालक निर्दोष मुक्तता

विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी गुजरातचे माजी पोलीस महासंचालक पी पी पांडे यांची इशरत जहाँ चकमक प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. पांडे हे सध्या जामिनावर बाहेर होते. सीबीआयने त्यांना २०१३ मध्ये अटक केली होती. १५ जून २००४ रोजी अहमदाबादजवळ मुंब्य्राला राहणाऱ्या इशरत जहाँ व जावेद शेखसह चौघांचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्यावेळी हे चौघेही पाकिस्तानी नागरिक असून, दहशतवाद्यांशी त्यांचे संबंध होते, असा दावा केला होता. पांडे हे चकमक झाली त्यावेळी अहमदाबादच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त होते. इशरत जहॉं आणि तिच्या साथीदारांना गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतच अहमदाबादच्या सीमेवर मारण्यात आले होते. सीबीआयने या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये पांडे यांच्यासह आयपीएस अधिकारी डी. जी. वंझारा, आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल, एन के अमिन,तरुण बरोत आणि अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश होता. त्यांच्यावर अपहरण, हत्या, कट रचणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पांडे यांना सीबीआयने जुलै २०१३ मध्ये अटक केली होती. ते जवळपास १९ महिने तुरुंगात होते.
No comments:
Post a Comment