Monday, 19 February 2018

कावेरी पाणी वाटप : कर्नाटकला लाभ; तामिळनाडूला फटका

कावेरी पाणी वाटप : कर्नाटकला लाभ; तामिळनाडूला फटका

गत १२० वर्षांपासून कर्नाटक व तामिळनाडूनमध्ये सुरू असणार्‍या कावेरी पाणी वाटप प्रश्नावर सर्वोच्‍च न्यायालयाने आगामी १५ वर्षांसाठी तोडगा काढला. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तामिळनाडूनची पाणी कपात करण्यात आली असून याचा लाभ कर्नाटकाला देण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटकला आता १४.७५ टीएमसी फूट पाणी अधिक मिळणार आहे. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्‍वाखालील पीठाने कावेरी पाणी वाटप न्यायाधीकरणचा निकाल कायम ठेवला. तसेच नदीवर कोणत्याही एका राज्याचा हक्‍क असू शकत नाही,असे सांगितले. तीन न्यायाधीशांच्या पीठाने दिलेल्या निकालानुसार, तामिळनाडूला ४०४.२५ टीएमसी फूट पाणी दिले जावे, असे निर्देश दिले.

No comments:

Post a Comment