Monday, 12 February 2018

उत्तर प्रदेशात ६ लाख विद्यार्थ्यांची परीक्षेला दांडी

उत्तर प्रदेशात ६ लाख विद्यार्थ्यांची परीक्षेला दांडी

उत्तर प्रदेशात योगी सरकारची कॉपी माफियांविरुध्द जोरदार  मोहिम सुरु आहे. याच मोहिमेमुळे जवळपास ६ लाखांच्यावर विद्यार्थ्यांनी माध्यमिक बोर्डाच्या परीक्षेला बसणेच टाळले आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दिनेश शर्मा यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास ६६ लाख विद्यार्थ्यांनी माध्यमिक बोर्डाच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ३३ हजार २१७ विद्यार्थी पहिल्या तीन दिवसात परीक्षा देण्यासाठी हजरच राहिले नाहीत. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दिनेश शर्मा म्हणाले ‘गेल्या वर्षी बाहेरच्या राज्यातील बरेच परीक्षार्थी परीक्षेच्या काळात अढळून आले होते.  असे विद्यार्थी ज्या शाळेत वर्षभर शिकवलेच जात नाही त्या शाळेत प्रवेश घेतात. अशा विद्यार्थ्यांनी यावर्षी परीक्षेकडे पाठ फिरवली आहे. हे कॉपी माीफयांविरुध्द सुरु असलेल्या मोहिमेचेच यश आहे.’ या शिक्षण मंत्र्याच्या दाव्याला  उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या अधिकऱ्यांनीही  दुजोरा दिला. उत्तर प्रदेशात यंदा ७.५ लाखाच्यावर विद्यार्थी परीक्षेला  गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षीचा विद्यार्थी गैरहजर राहण्याचा आकडा कधीच मागे पडला आहे.


No comments:

Post a Comment