गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत जाहीर
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना शासनाकडून मदत जाहीर झाली आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बुधवारी दुपारी मदतीची घोषणा केली. एनडीआरएफच्या निकषानुसार मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेत पीकाच्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर शेतक-यांना ही मदत मिळणार आहे. पीक विमा काढलेल्या शेतक-यांना जास्तीत जास्त रक्कम मिळेल. त्याचप्रमाणे पीक विमा न काढलेल्या शेतक-यांनाही मदत दिली जाईल. ज्वारी, मका गहूसाठी प्रतिहेक्टर 6,800 रुपये मिळणार, सिंचनातील जमिनीसाठी प्रतिहेक्टर 13,500 रुपये मदत दिली जाईल, मोसंबी, संत्र प्रतिहेक्टर 23,300 रुपये मिळणार, आंबा प्रतिहेक्टर 36 हजार 700 रुपये मदत दिली जाईल, केळी प्रति हेक्टर 40 हजार रुपये मदत दिला जाईल, लिंबू प्रतिहेक्टर 20 हजार रुपये मदत दिली जाईल, हरभरा, सुर्यफूल प्रतिहेक्टर 6800 रुपये मिळणार, आणि पीकविमा न काढलेल्यांना प्रतिहेक्टर 18 हजार रुपये मदत दिली जाईल.
No comments:
Post a Comment