पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाकडून मुंढेंच्या निर्णयांना केराची टोपली

तुकाराम मुंढे यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदावरुन बदली होताच त्यांनी घेतलेले सर्व निर्णय संचालक मंडळाने बदलले आहेत. मुंढेंनी कामावरुन काढून टाकलेल्या १५८ कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर रुजू करुन घेण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक पालिकेची साफसफाई मुंढेंनी हाती घेतली आहे. पण पीएमपीएमएलमध्ये पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती निर्माण झाली आहे. अध्यक्षपदी असताना मुंढेंनी घेतलेले निर्णय पीएपीएमएलच्या संचालक मंडळाने रद्द केले आहेत. बडतर्फ आणि निलंबित करण्यात आलेल्या १५८ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येणार आहे. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या पासमध्ये करण्यात आलेली वाढही मागे घेतली जाणार. त्याचबरोबर संचालक मंडळ मुंढेंच्या काळात मंजूर झालेला आस्थापना आराखडाही नामंजूर करणार आहे. महापौर, सरंजामी समिती अध्यक्ष, उपमहापौर, नगरसेवक अशा राजकीय व्यक्ती पीएमपीएमएलच्या संचालक मंडळावर असून तुकाराम मुंढेंच्या जागी आलेल्या नयना गुंठे संचालक मंडळाने घेतलेले हे निर्णय मान्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
No comments:
Post a Comment