इसरोचे स्वस्तात मस्त चांद्रयान २
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या चांद्रयान-2 या मोहिमेचा खर्च हॉलिवूडमधील विज्ञानपटाच्या कितीतरी पटीने कमी असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.के.शिवन यांनी दिली. हॉलिवूडमधील सायन्स फिक्शन असलेल्या Interstellar या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च 1 हजार 062 कोटी इतका होता. तर‘इस्रो’च्या चांद्रयान-2 या मोहिमेचा खर्च केवळ 800कोटी रुपये इतका आहे. जागतिक अंतराळ संशोधन क्षेत्रात ‘इस्रो’ने स्वत:चे स्वतंत्र असे स्थान निर्माण केले आहे. पहिल्या प्रयत्नातच मंगळावर यशस्वी यान पाठवण्याचा पराक्रम ‘इस्रो’ने केला होता. ही कामगिरी अमेरिकेच्या नासा, युरोपियन अवकाश संशोधन संस्था अथवा चीनला देखील करता आली नव्हती. त्याचबरोबर कमी किमतीत उपग्रह अवकाशात प्रस्थापित करण्यात‘इस्रो’ने सर्वांनाच मागे टाकले आहे.
No comments:
Post a Comment