Tuesday, 13 February 2018

गारपीटग्रस्तांना शासन मदत करेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गारपीटग्रस्तांना शासन मदत करेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा कृषी महोत्सवाचे व दख्खन जत्रेचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्र्यांनी विविध स्टॉलना भेट देऊन पाहणी केली. काल झालेल्या गारपीटग्रस्तांनाही शासन मदत करेल. गेल्या सरकारने 15 वर्षांत 5 हजार कोटीही दिले नाहीत. आम्ही 3 वर्षात 12 हजार कोटी दिलेत. कोणते सरकार शेतकऱ्यांचे? तुम्हीच ठरवा, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.  अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ११ जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याची महिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली आहे. बाधित ११ जिल्ह्यांमध्येबीड, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे.


No comments:

Post a Comment