सर्वोच्च न्यायालयाकडून मिलिंद एकबोटेंना २० फेब्रुवारीपर्यंत जामीन

सर्वोच्च न्यायालयाने पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना दिलासा दिला असून एकबोटे यांना न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. एकबोटे यांना जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. नंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.कोरेगाव-भीमा येथे दंगल एकबोटे यांनी दिलेल्या चिथावणीनंतर उसळली, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल झाला असून चिथावणी देणे, दगडफेकीस प्रवृत्त करणे, लोकांना चिथावणी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
No comments:
Post a Comment