Wednesday, 7 February 2018

रूग्‍णालयावर हल्‍ला करून २ दहशतवादी फरार

रूग्‍णालयावर हल्‍ला करून २ दहशतवादी फरार


श्रीनगरमधील श्रीहरी सिंह रुग्णालयात पोलिसांवर गोळीबार करून दोन दहशतवादी फरार झाले आहेत. अबू हंजुला असे फरार झालेल्‍या यातील एका दहशतवाद्याचे नाव आहे. त्‍याला वैद्यकिय तपासणी करण्याकरिता हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. त्‍यावेळी काही दहशवतवाद्यांनी रूग्‍णालयावर हल्‍ला केला हंजुला यानेही यावेळी पोलिसांच्या हातातील रायफल हिसाकवून घेत पोलिसांवर गोळीबार केला. त्‍यात दोन पोलिस शहीद झाले आहेत. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हंजुला याला वैद्यकीय तपासणीसाठी श्रीहरी सिंह रूग्‍णालयात आणण्यात आले होते. ही माहिती दहशतवाद्यांना मिळाल्‍यानंतर हंजुलाला सोडविण्यासाठी या दहशतवाद्यांनी रूग्‍णालयावरच हल्ला चढवत रूग्‍णालयाच्या आतच या अंधाधूंद गोळीबार केला. यावेळी हंजुलानेही पोलिसांच्या हातातून रायफल घेत पोलिसांवर गोळीबार केला आणि पोलिसांच्या हातून पळ काढला.

No comments:

Post a Comment