नीरव मोदीच्या ९ गाड्या जप्त

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या मालमत्ता आणि कंपन्यांवर सीबीआय आणि ईडीकडून छापेमारी सुरूच आहे. ईडीने नीरव मोदीच्या कोट्यावधी रूपये किंमत असलेल्या ९ कार जप्त केल्या आहेत. याबरोबरच ७.८० कोटी रुपये किंमतीचे म्युच्युअल फंड आणि शेअर्सही गोठवले आहेत. त्याबरोबरच मेहुल चोक्सीच्या ग्रुपशी संबंधित ८६.७२ कोटींचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड्सही गोठवण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी ईडीने ही कारवाई केली. या कारवाईत एक टोयोटा फॉर्च्युनर, एक टोयोटा इनोव्हा, एक रोल्ज रॉयस घोस्ट, दोन मर्सिडिज बेंझ जीएल ३५० सीडीआयएस, एक पोर्शे पनामेरा आणि तीन होंडा या कार जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या कारमधील रोल्ज रॉयस कारची किंमत सुमारे ६ कोटी रुपये इतकी आहे. दरम्यान, सीबीआयने मंगळवारी नीरव मोदीचे अलिबागमधील अलिशान फार्म हाऊसलाही सील ठोकले होते.
No comments:
Post a Comment