Tuesday, 20 February 2018

९०० रेटींग पॉईंटचा टप्पा गाठणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू

९०० रेटींग पॉईंटचा टप्पा गाठणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू 

दिवसेंदिवस नवनवीन विक्रम आपल्या नावावर करण्याचा सपाटा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सुरु तेह्वला असून विराट कोहली आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत ९०० रेटींग पॉईंटचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. ही किमया गेल्या २७ वर्षांमध्ये कोणत्याही खेळाडूला साधता आली नव्हती. सध्या ९०९ गुणांसह कोहली एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. सर विव्हीअन रिचर्ड, झहीर अब्बास, ग्रेग चॅपल, डेव्हीड गोवर, डीन जोन्स आणि जावेद मियादाद यांनी विराट कोहलीच्या आधी आपल्या कारकिर्दीत ९०० रेटींग पॉईंटचा टप्पा गाठला होता. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ५५८ धावांची लयलूट केली होती. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९०० किंवा त्यापेक्षा जास्त रेटींग पॉईंटचा टप्पा गाठणारा विराट कोहली हा दुसरा खेळाडू ठरला आहे.

No comments:

Post a Comment