धर्मा पाटील यांच्यानंतर आता मंत्रालय परिसरात आणखी एक मृत्यू
धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच हर्षल रावते हा 44 वर्षीय युवक मंत्रालयाच्या परिसरात मृत्यू पावला आहे. मंत्रालय इमारतीखाली जखमी अवस्थेत सापडल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून हर्षलनं उडी मारल्याचं समोर येत आहे, पण याला अद्याप पोलिसांचा दुजोरा मिळू शकलेला नाही. हर्षल मुंबईतल्या चेंबूर येथे वास्तव्यास असल्याचं त्याच्या ओळखपत्रांवरून लक्षात येतं. तो पैठणच्या कारागृहात शिक्षा भोगत असल्याचंही ओळखपत्रावरून समजलं. दरम्यान हर्षल पडला की, त्यानं उडी मारली याविषयी निश्चित काहीही कळू शकलं नाही.
No comments:
Post a Comment