नीरव, चोक्सीचा आणखी १,३२२ कोटींचा घोटाळा
पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचा 1,322 कोटी रुपयांचा आणखी एक घोटाळा समोर आणला आहे. बँकेच्या परदेशातील शाखेला मिळालेल्या नव्या लेटर ऑफ अंडरटेकिंगनंतर हा घोटाळा लक्षात आला असून, पीएनबीने स्टॉक एक्स्चेंजला त्याची माहिती दिली. यापूर्वी पीएनबीतील 11,400 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. नीरव मोदीच्या अवैध व्यवहाराचा आकडा 12,700 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचे पीएनबीने आपल्या फायलिंगमध्ये स्टॉक एक्स्चेंजला कळवले आहे. नीरव मोदीच्या कंपन्यांनी आयात-निर्यातीशी संबंधित तब्बल 515 कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय व्यवहार दडवून ठेवले.करचोरी करून करण्यात आलेले हे व्यवहार आता प्राप्तिकर विभागाकडून तपासले जात आहेत.






