ओम प्रकाश रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड

ओम प्रकाश रावत यांच्या नावावर मुख्य निवडणूक आयुक्तपदी शिक्कामोर्तब करण्यात आले असून या संदर्भातली घोषणा केंद्र सरकारने केली आहे. ही माहिती केंद्र सरकारने जारी केलेल्या एका पत्रकानुसार समोर आली आहे. आता ओम प्रकाश रावत अचल कुमार ज्योती यांच्या जागी काम पाहतील. २३ जानेवारीला अचल कुमार ज्योती यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे ओम प्रकाश रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नसीम जैदी ज्योती यांच्या आधी मुख्य निवडणूक आयुक्त होते. जुलै २०१७ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अचल कुमार ज्योती यांनी हे पद स्वीकारले. आता ज्योती यांचा कार्यकाळ संपल्याने ओम प्रकाश रावत हे मुख्य निवडणूक आयुक्त असतील.
No comments:
Post a Comment