Monday, 22 January 2018

इंग्लंडमधून महाराष्ट्रातील ५० तरुण बेपत्ता

इंग्लंडमधून महाराष्ट्रातील ५० तरुण बेपत्ता

इंग्लंडला कामानिमित्त गेलेले नागपुरातील ५० तरुण बेपत्ता झाले असून मुस्लीम आणि शिख समाजाच्या तरुणांचा यामध्ये समावेश आहे. नागपुरातील या ५० तरुणांनी दोन वर्षांपूर्वी इंग्लंडला जाण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्ट काढला. हे तरुण इंग्लंडला कामासाठी आणि पालकांना भेटण्यासाठी जात असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. पण हे तरुण व्हिसाची मुदत संपल्यानंतरही परत न आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. यातील काही तरुण कामासाठी तर काही पालकांना भेटण्यासाठी जात असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. या तरुणांच्या व्हिसाची मुदत ऑक्टोबर २०१७ मध्ये संपली. इंग्लंड प्रशासनाने व्हिसाची मुदत संपल्यावर या तरुणांनी दिलेल्या पत्त्यावर त्यांचा शोध घेतला. पण ही मुले या पत्त्यावर आढळली नाहीत. मुंबईतील ब्रिटीश उपउच्चायुक्तांनी नागपूर पोलीसांना या मुलांचा शोध घ्या, त्यांच्याबाबत चौकशी करा, असे सांगीतले.

No comments:

Post a Comment