मराठी बालकलाकार प्रफुल भालेरावचे अपघाती निधन

झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या 'कुंकू' मालिकेत जानकीच्या भावाची गण्याची भूमिका साकारणारा अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन झालं. प्रफुल्ल सध्या मालाडमधल्या एका कंपनीत काम करत होता. तिथली नाईट शिफ्ट संपवून तो पहाटे घरी जात होता. तो मालाडहून पहाटे चार बाराची चर्चगेट लोकल पकडत होता. धावत लोकल पकडत असताना त्याचा हात सुटला आणि तो समोरच्या खांबावर आपटला, त्यातच त्याच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह सापडला. बालकलाकार म्हणून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणारा प्रफुल्ल कुंकू मालिकेमुळे घरघरात पोहोचला होता. अलीकडे प्रदर्शित झालेल्या 'बारायण' सिनेमातही त्याने भूमिका साकारली होती. मालाडजवळ रेल्वे अपघातात प्रफुल्लचे निधन झाले. कलर्स मनोरंजन वाहिनीवरील तू माझा सांगती, नकुशी, ज्योतिबा फुले या मालिकांमध्येही त्याच्या भूमिका गाजल्या.
No comments:
Post a Comment