Monday, 22 January 2018

स्त्रीच्या संमतीशिवाय कोणीही तिला स्पर्श करू शकत नाही: न्यायालय

स्त्रीच्या संमतीशिवाय कोणीही तिला स्पर्श करू शकत नाही: न्यायालय


एखाद्या स्त्रीच्या संमतीशिवाय कोणीही तिला स्पर्श करू शकत नाही, असे स्पष्ट करतानाच वासनांध आणि लैंगिकदृष्ट्या विकृत लोकांच्या महिला बळी ठरतात, हे दुर्दैवी असल्याचे दिल्लीतील न्यायालयाने म्हटले आहे. नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चावीराम नावाच्या व्यक्तीला न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तेव्हा न्यायालयाने हे मत व्यक्त केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सीमा मैनी यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली. स्त्रीचे शरीर हे तिचे स्वत:चे असते आणि त्यावर केवळ तिचाच अधिकार असतो. अन्य सर्वांना कोणत्याही कारणासाठी तिच्या संमतीशिवाय तिच्या शरीराला स्पर्श करणे निषिद्ध आहे, असे न्यायालयाने म्हटले. चावीराम हा लैंगिकदृष्ट्या विकृत असल्यामुळे तो दयेस पात्र नाही, असे सांगून न्यायाधीशांनी त्याला 10,000 रुपयांचा दंड ठोठावला. त्यातील 5,000 रुपये मुलीला देण्यात येणार आहेत.


No comments:

Post a Comment