जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यामधील दोन दहशतवादी हे स्थानीक असून एकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. ठार करण्यात आलेल्या दहशताद्यांकडे मोठ्या प्रमाणात गोळीबारचा साठा होता. तो जप्त करण्यात आला आहे. अनंतनाग परिसरातील शाळा, कॉलेज आज बंद ठेवण्यात आल्या असून इंटरनेट सेवेचा वेग कमी करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधील माजी मंत्री अब्दुल मजीद यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. यानंतर दहशतवाद्यांकडून या परिसरात दहशत पसरविण्याचे काम सुरू आहे.
No comments:
Post a Comment