Tuesday, 13 March 2018

उत्तर प्रदेशात तुरुंगात एचआयव्हीचा कहर

उत्तर प्रदेशात तुरुंगात एचआयव्हीचा कहर

उत्तर प्रदेशातील तुरुंगांमध्ये एचआयव्हीची लागण झालेल्या कैद्यांची संख्या वाढत असून यामुळे संपूर्ण खात्यात हाहाकार उडाला आहे. अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राज्यातील विविध तुरुंगांमध्ये असलेल्या कैद्यांची रक्तचाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी गाझियाबाद जिल्ह्यातील दसना तुरुंगात 27 कैदी एचआयव्हीग्रस्त असल्याचे आढळले होते, तर मेरठ येथील तुरुंगात 10 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. गेल्या महिन्यात गोरखपूर तुरुंगात 10 कैदी एचआयव्हीग्रस्त असल्याचे आढळले होते. यामुळे अनेक कैद्यांनी आपले कुटुंबीय व वकिलांशी संपर्क साधून वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. अन्यथा तुरुंगात आपल्या आरोग्याला धोका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने राज्य सरकारला नोटिस बजावली असून सहा आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

No comments:

Post a Comment