राज्यातील गुटखा विक्रेत्यांवर दाखल करणार अजामीनपात्र गुन्हा
बुधवारी अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी राज्यात सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर कडक कारवाई करण्यासाठी याचा तपास हा दक्षता पथकामार्फत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी हे आश्वासन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिले. बापट यांनी यावेळी गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जावा, यासाठी कायदा करू आणि त्यानंतरही जर समाधान झाले नाही तर सीआयडीमार्फत या विक्री प्रकरणाची चौकशी करू, असेही आश्वासन दिले. या लक्षवेधी दरम्यान, गुटखा बंदी असतांना राज्यात गुटखा विक्री होतेच कशी ? असा सवाल मुंडे यांनी केला. गुटखा उत्पादन, विक्री सर्वात जास्त परिमंडळ-५ (भिवंडी) मध्ये आहे, याची चौकशी सीआयडी मार्फत करावी विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध एसीबी मार्फत चौकशी करावी, अशी धनंजय मुंडेंनी केली.
No comments:
Post a Comment