Thursday, 1 March 2018

हज यात्रेचा विमान प्रवास स्वस्तात

हज यात्रेचा विमान प्रवास स्वस्तात


केंद्र सरकारने हज यात्रेकरूंना विमानाच्या तिकीट दरात सवलत देऊन दिलासा दिला आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हज यात्रेचे अनुदान बंद केले होते. या पार्श्‍वभूमीवर हज यात्रेकरूंना विमानाच्या तिकीट दरात सवलत देण्यात येणार आहे. एअर इंडिया, सौदी एअरलाईन्स, फ्लायनास आदी विमान कंपन्यांचे तिकीट हज यात्रेकरूंसाठी स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी जाहीर केला. सौदी अरेबिया, जेदाह आणि मदिना येथील विमानतळांवर ही सुविधा मिळेल. तर देशातील 21 विमानतळांवर हज यात्रेकरूंना तिकीट दरात सवलत देण्यात येणार आहे. किमान 30 ते 40 हजारांदरम्यान तिकीट दरात सवलत देण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment