टेबल टेनिसपटूवर प्रेयसीनेच केला बलात्काराचा आरोप

टेबल टेनिसपटू सौम्यजीत घोषविरोधात एका १८ वर्षीय तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, लग्नाचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून घोष तिच्यावर अत्याचार करत होता. पीडित तरुणीने कोलकातामधील बरसात पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. प्रसारमाध्यमात रंगणाऱ्या चर्चांनुसार सौम्यजीत आणि पीडित तरुणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. दोघांच्यातील मैत्री झाल्यानंतर या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले होते. घरी कोणी नसताना सौम्यजीत अनेकदा घरी यायचा. याशिवाय त्याच्या सिल्लीगुडी येथील घरीही आम्ही अनेकदा भेटलो आहे, असा दावा तरुणीने केला आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी सौम्यजीत आता आपल्या मुलीकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले आहे. तो तिच्यासोबत असणारे संबंध तोडण्याची भाषा करत होता. त्यामुळे पोलिसात जावे लागले, असेही ते म्हणाले आहेत.
No comments:
Post a Comment