Tuesday, 13 March 2018

शेतकऱ्यांच्या ८० टक्के सरकारकडून मागण्या मान्य

शेतकऱ्यांच्या ८० टक्के सरकारकडून मागण्या मान्य


30,000 शेतकऱ्यांनी सहा दिवस काढलेला 180 किं.मी चालत प्रवास करून काढलेला शेतकरी मोर्चा सोमवारी अखेर यशस्वी झाला. आपल्या हक्कांसाठी थेट मुंबई गाठणाऱ्या शेतकऱ्यांना सगळ्याच  स्तरातून ,सर्व विचारधारांच्या लोकांनी पाठिंबा मिळाला. सहा दिवसांच्या मोर्चा नंतर सोमवारी विधानभवनातील सचिवालयात दुपारी तीन तास किसान लाँग मार्चच्या आंदोलकांच्या १२ जणांच्या शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यातील वाटाघाटीची बैठक चालली. मंत्रिगट समितीचे सदस्य गिरीश महाजन या बैठकीनंतर बोलताना म्हणाले, शेतकरी नेते व इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलकांच्या १२-१३ मागण्या होत्या. त्या बहुतेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. आजच्या बैठकीतील चर्चेनंतर आंदोलकांचे शिष्टमंडळ समाधान झाल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment