Friday, 23 March 2018

राज्यसभेच्या 58 जागांसाठी 16राज्यांमध्ये मतदान

राज्यसभेच्या 58 जागांसाठी 16राज्यांमध्ये मतदान

राज्यसभेच्या 58 जागांसाठी उद्या 16 राज्यांमध्ये होणार आहे.तसंच एक लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे.या निवडणुकांनंतर भाजप बहुमताच्या अजून जवळ पोचण्याची शक्यता आहे. राज्यसभेचं संख्याबळ कायम250च राहत. यातले 233 सदस्य हे निवडून आलेले असतात तर उरलेले सर्व खासदार नामांकित असतात. राज्यसभेत प्रत्येक राज्याला ठराविक जागा दिलेल्या असतात. या जागा त्या त्या राज्याच्या संख्याबळानुसार ठरतात. राज्यसभेसाठी सामान्य माणसं मतदान करत नाहीत तर विधानसभेचे आमदार मतदान करतात . राज्यसभेत निवड होण्यासाठी मतसंख्या ठरलेली असते. उदा.उत्तर प्रदेशात 404 पैकी 37 मत मिळवणारा उमेदवार राज्यसभेवर निवडला जातो. या फेरीत उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश ,राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश बिहार,गुजरात, हरयाणा, तेलंगण या राज्यांचा समावेश आहे. सध्या राज्यसभेत कुठल्याच पक्षाला बहुमत नाही. भाजपकडे 58 जागांसकट सर्वाधिक जागा आहेत तर काँग्रेसकडे 54 जागा आहे. या निवडणुकांनतर भाजप बहुमताच्या अधिक जवळ पोचेल.उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांमधून जास्त जागा मिळायची भाजपला अपेक्षा आहे. त्यात उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक 10 जागांसाठी मतदान होणार आहे.

No comments:

Post a Comment