आगामी काळातील तापमानवाढ पिकांना घातक
अमरावती जिल्ह्यासह विभागात आगामी काळात तापमानवाढ होणार असल्याचा ‘टेरी’चा अहवाल आहे. पिकांसाठी हे वातावरण अत्यंत घातक असल्याने आतापासूनच नियोजन हवे, यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने शेतक-यांसाठी शिफारशी सुचविल्या आहेत. शेतक-यांना गावपातळीवरील हवामान व पिकावरील रोगराई तसेच वातावरणाच्या अनियमिततेमध्ये जोखीम व्यवस्थापनासंदर्भात अचूक माहिती व थेट सल्ला पुरविणारी यंत्रणा (अॅग्रोक्लायमेट सेंटर) विकसित करण्याची शिफारस कृषी विभागाला केली आहे. शेतकºयांना बदलत्या वातावरणास अनुरूप बदलणारी पीकपद्धती व तंत्रज्ञानविषयक माहिती उपलब्ध करून देणे, अशा वातावरणात वाढू शकतील व तग धरू शकणा-या पिकांंच्या व फळांच्या प्रजातीच्या संशोधनास व लागवडीस प्रोत्साहन देणे, जुन्या पारंपारीक पिकांचे सवंर्धन करणे, सुक्ष्म जलसिंचनास प्रोत्साहन देणे फळबाग नियंत्रण व व्यवस्थापनाबात शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment