Friday, 23 March 2018

जयललिता रूग्णालयात असताना सगळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते

जयललिता रूग्णालयात असताना सगळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते


तामिळ नाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता या 75दिवस अपोलो रूग्णालयात दाखल असताना रूग्णालयातील सगळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते असा धक्कादायक  खुलासा अपोलो रूग्णालयाचे प्रमुख डॉ प्रताप रेड्डी यांनी केला आहे. यामुळे जयललितांच्य मृत्यूभोवती असलेली  प्रश्नचिन्ह अधिकच गडद झाली आहेत. जयललिता रूग्णालयात   उपचार घेत असतानाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी त्यांच्या सहकारी शशीकला आणि त्यांचा पुतण्या दिनकरन करून जाहीर करण्यात आला होता. तर शशीकला यांनी जयललिता उपचार घेत असताना त्यांचं चित्रीकरण केलं जातं होतं अशी माहिती दिली होती. पण हे सगळेच आरोप रूग्णालय प्रशासनाने खोडून काढले आहे. जयललिता उपचार घेत असताना तिथले सगळेच कॅमेरे बंद होते.तसंच त्यांच्या विशेष वार्डात अजून 24 रूग्णांची क्षमता असूनसुद्धा तिथे फक्त त्या एकट्याच उपचार घेत होत्या. त्या अतिदक्षता विभागात असतानाही त्याचं चित्रीकरण करण्यात आलं नाही असं रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे.

No comments:

Post a Comment