बंगालमध्ये मुखर्जींच्या पुतळ्याला काळे फासले
पुतळ्यांच्या मोडतोडीच्या आणि विटंबना करण्याचे लोण त्रिपुरा, तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही पोहोचले आहे. पश्चिम बंगालमधील कालीघाट येथील भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची विटांबना करण्यात आली आहे. पुतळ्यांच्या विटंबनेचा बदला विटंबनेनेच देण्याचे पेव सुटल्याचे चित्र या घटनेवरून दिसत आहे. कालीघाटमध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा एक अर्धपुतळा आहे. हे कृत्य कोणी केले त्याची अद्याप माहीती मिळालेली नाही. हे कृत्य ज्यांनी केले त्यांनी पुतळ्याचे फक्त नुकसानचे केले नाही तर त्याला काळे देखील फासले आहे. या प्रकारानंतर संबंधितांनी पुतळ्याच्या खाली एक पोस्टरही ठेवले आहे. हे पोस्टर बंगाली भाषेत आहे. पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांच्या विरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी भाजपचे सचिन सयंतन बासु यांनी केली.
No comments:
Post a Comment