Thursday, 1 March 2018

‘जीएसटी’चा एकच दर लागू करणे अशक्य : जेटली

‘जीएसटी’चा एकच दर लागू करणे अशक्य : जेटली

विद्यमान परिस्थितीत ‘जीएसटी’चा एकच दर लागू करणे अशक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी केले. भारत-कोरिया व्यापार परिषदेत ते बोलत होते. अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत, याच्या परिणामी देशाचा जीडीपी दर 7 ते 8 टक्क्यांपेक्षाही जास्त जाऊ शकतो, असा विश्‍वास व्यक्‍त करून जेटली पुढे म्हणाले की, जगातील सर्वात वेगाने विकसित होत असलेला देश हा भारताचा नावलौकिक येत्या 10 ते 20वर्षांत तरी कायम राहील. करांचे सुसूत्रीकरण करण्यात सरकारला यश आले आहे, असा दावा करून जेटली पुढे म्हणाले की, काही क्षेत्रांना जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले जात आहे. निर्मिती क्षेत्रात भारताला अजून बरेच काही साध्य करायचे आहे. त्यामुळे देशांतर्गत निर्मिती वाढावी, यासाठी सरकार आगामी काळात विशेषत्वाने लक्ष देणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment