Thursday, 8 March 2018

कर्नाटकच्या लोकायुक्तांवर प्राणघातक हल्ला

कर्नाटकच्या लोकायुक्तांवर प्राणघातक हल्ला


कर्नाटकचे लोकायुक्त पी.विश्वनाथ शेट्टी यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला आहे. एका तरूणाने त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर हल्ला केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तेजस शर्मा नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर शेट्टी यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.  बुधवारी नेहमीप्रमाणे लोकायुक्तांच्या कार्यालयात सुनावणी सुरू होती. त्यावेळी हल्लेखोरेने त्यांच्यावर धारधार शस्त्राने अनेक वार केले. पी.विश्वनाथ शेट्टी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. घडलेल्या प्रकाराची चौकशी सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने लोकायुक्तांच्या कार्यालयापर्यंत शस्त्र नेलेच कसे याची चौकशी सुरू असल्याचेही कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी लोकायुक्तांची भेट घेतली.

No comments:

Post a Comment