Thursday, 8 March 2018

‘बीएसएफ’ जवानावरील कारवाई पंतप्रधानांच्या सूचनेनंतर मागे

‘बीएसएफ’ जवानावरील कारवाई पंतप्रधानांच्या सूचनेनंतर मागे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापुढे ‘श्री’ असा उल्लेख न केल्याने सीमासुरक्षा दलातील (बीएसएफ) जवानाचा सात दिवसांचा पगार कापण्यात आला होता. मात्र, यावर पंतप्रधान मोदी यांनी स्वतः नाराजी व्यक्‍त करत ही कारवाई मागे घेण्याची सूचना बीएसएफ प्रशासनाला केली. यानंतर ही कारवाई मागे घेण्यात आली. हा सर्व प्रकार पश्‍चिम बंगालच्या महतपूर येथील 15 बीएसएफ बटालियनच्या मुख्यालयातील आहे. फेब्रुवारी महिन्यात या बटालियनचे जवान झीरो परेड करत होते. यावेळी संजीवकुमार या जवानाने ‘मोदी प्रोग्राम’ असा एका कार्यक्रमाचा उल्लेख केला. या घटनेची वरिष्ठ अधिकार्‍यांनी नोंद घेतली. यानंतर संजीवकुमार याला समन्स देऊन प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यामध्ये संजीवकुमार दोषी आढळल्यानंतर त्याचा सात दिवसांचा पगार कपात करण्यात आला होता. मात्र, पंतप्रधानांच्या सूचनेनंतर ही कारवाई आता मागे घेण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment