राज्यावर ‘स्क्रब टायफस’ या आजाराचे संकट
सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस' याकीटकजन्य आजाराचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवरराज्याची आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे. राज्यातइतरत्र या आजाराची लागण होऊ नये, यासाठी प्रभावीउपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य यंत्रणेलादेण्यात आले. रिकेटशिअल आजारात मोडणाऱ्या स्क्रबटायफसवर नियंत्रण राखण्यासाठी या आजाराचे नियमितसर्वेक्षण, निदान व उपचाराबाबत पायाभूत सुविधाबळकट करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य सेवासहसंचालकांनी उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय आरोग्यअधिकाऱ्याना दिले आहेत. कीटकापासून माणसातसंक्रमित होणाऱ्या ‘स्क्रब टायफस’ या आजाराचे सिंधुदुर्गजिल्ह्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल २आॅक्टोबरला प्राप्त झाला.
‘स्क्रब टायफस’ या आजारातझटके येणे, शरीरातील पाणी कमी होणे, ताप येणे, अशीलक्षणे आढळतात. हा ताप १०४ डिग्रीपर्यंत राहतो. साधारण २४ तासाच्या आत थकवा येणे, अंगदुखी, स्रायू,सांधे दुखू लागतात. या आजाराचे वेळीच निदान झालेनाही तर शरीरात दबा धरुन बसणारे हे परजिवी मेंदूची, मुत्रपिंडाची क्रिया बंद पाडू शकतात. साधारणपणे तापआणि काविळीचे लक्षणे आढळून आल्यानंतरही हाआजार अनेकदा डोके वर काढतो.
No comments:
Post a Comment