कर्जमाफीनंतरही ३० टक्के शेतकरी मुकणारनवीन कर्जाला
शासनाने २००९ नंतरच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांनाकर्जमाफी घोषित केली आहे. परंतु २००८ पूर्वी कर्जदारअसलेले शेतकऱ्यांना जुने कर्ज भरल्याशिवाय नवीनकर्जच मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट शासनाने छत्रपतीशिवाजी महाराज शेतकरी सन्मान ही योजना घोषितकेली. या योजनेत १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६पर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे ३० जून २०१६ पर्यंतथकीत असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभमिळणार आहे. ऐतिहासिक म्हणून शासनाने घोषितकेलेल्या या कर्जमाफीची रक्कम कुण्याही शेतकऱ्याच्याखात्यात अद्याप आली नाही. एवढेच काय शासनानेसन्मानपूर्वक कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्याशेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळाला नाही. कर्जमाफीवरून शेतकऱ्यांमध्ये आता असंतोष धुमसतअसताना २००८ पूर्वीचे कर्जदार म्हणजेच ३०% शेतकरीनवीन कर्जास मुकणार असल्याचे वास्तव पुढे येत आहे.

No comments:
Post a Comment