वांद्रे झोपडपट्टीतील भीषण आग अकस्मातनव्हती
गुरुवारी दुपारच्या सुमारास वांद्रे स्टेशनच्या पूर्वेकडीलबेहरामपाडा झोपडपट्टीत आग लागल्याची घटना घडलीहोती. या आगीच्या कारणाचा तपास केला असता, शब्बीरखान (२९) या तरुणाने त्या दिवशी महापालिकेने सुरूकेलेली अतिक्रमण विरोधी कारवाई थांबवण्यासाठी आगलावली असल्याची माहिती समोर आली आहे. शब्बीरखान या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आझादमैदान हिंसाचारातील शब्बीर खान हा आरोपी आहे. दरम्यान न्यायालयात शब्बीरला पोलिसांनी हजर केलेअसता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधीपथकाने अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई सुरूकेली होती. त्याचवेळी दुपारच्या सुमारास तेथीलझोपड्यांना अचानक आग लागली होती. शेकडोझोपड्या या आगीत जळाल्या. त्यानंतर ही आगअतिक्रमण कारवाई थांबविण्यासाठी लावण्यात आलीअसल्याच्या संशयावरून पोलिसांनी तपास सुरू केलाहोता. त्यावेळी ही आग शब्बीर खान व त्याच्या काहीसाथीदारांनी लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली
No comments:
Post a Comment