लव्ह जिहादवर सर्वोच्च न्यायालयाची सुनवाई
सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील लव्ह जिहादप्रकरणातील सुनावणीवेळी महत्त्वपूर्ण मत मांडले. याचिकेवरील सुनावणीवेळी मुलगी सज्ञान असून, लग्नाततिची इच्छा महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच २७नोव्हेंबर रोजी अखिलाला सर्वोच्च न्यायालयातजबाबासाठी हजर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानेदिले. डिसेंबर महिन्यात एका हिंदू महिलेशी केरळमध्येराहणाऱ्या शफीन जहान याने विवाह केला होता. यामहिलेने लग्नापूर्वीच इस्लाम धर्म स्वीकारला. पण हे लव्हजिहाद प्रकरण असल्याचे सांगत हा विवाह केरळ उच्चन्यायालयाने रद्द केला होता. या महिलेचे नाव अखिलाअशोकन उर्फ हादिया असे असून, स्वेच्छेने मी लग्नकेल्याचा दावा तिने केला होता. जहानने केरळ उच्चन्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयातयाचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयानेऑगस्टमध्ये या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशएनआयएला दिले होते. अखिला सध्या तिच्या वडिलांच्याघरी आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे २७ नोव्हेंबररोजी होणाऱ्या सुनावणीत अखिलाशी संवाद साधतीलआणि तिच्या मानसिक स्थितीचा आढावा घेतील. त्यानंतरगरज वाटल्यास योग्य यंत्रणांमार्फत तिची तपासणी केलीजाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment